Sunday, 18 January 2015

दहशतवाद आणि आपली पत्रक्रारिता





चार्ली हेब्दो वरील हल्ल्यानंतर पाकिस्तानमध्ये हल्लेखोरांना श्रद्धांजली देण्याचा कार्यक्रम पार पाडण्यात आला. पाकिस्तानमधील चौकाचौकत असे कार्यक्रम पार पडण्यात आले. हा हल्ला म्हणजे इस्लाम आणि पैगम्बराचा अपमान करणाऱ्या व्यक्तिना शिक्षा  देण्यासाठी इस्लाम च्या कायद्यानुसार आणि संदेशानुसार करण्यात आला अाहे हे ठासुन सांगण्यात आले. त्या शहीद  झालेल्या हल्लेखोरना जन्नत मध्ये जागा मिळओ, अशा प्रकारची प्रार्थना करण्यात आली. लाहौर मधील शाळेवर झालेल्या दहशतवादी  हल्ल्यानंतर पाकिस्तानमधे अशाप्रकारचे कार्यक्रम जोरात होतात हे विशेष। तसही पाकिस्तान कडून अशाच प्रकारच्या गोष्टींची अपेक्षा असते त्या मध्ये नवीन काही नाही.  लाहोर हल्ल्यानंतर पाकिस्तान मध्ये काही सुधारणा  होईल अशी अपेक्षा होती पण कुत्र्याच शेपुट ते…।
       इकडे भारतामध्ये ही असे कार्यक्रम पार पाडणाऱ्यांची संख्या कमी नाही  बसप च्या एक माजी खासदारने हल्लेखोराना ५१ कोटींचे बक्षीस जाहिर केले. जुन्या हैदराबाद मध्ये मौलाना मो नसरुद्दीन ने श्र्द्धांजलि च्या कार्यक्रमासोबत भड़काऊ भाषण देत इस्लाम च्या विरोधात जाणाऱ्याना अशाच प्रकारच्या परिणामांना सामोरे जावे लागेल अशा प्रकारचे फुत्कार सोडले. हे महाशय  पोटा कायद्यानांतर्गत ५ वर्षे तुरंगचि हवा खाऊन  आले आहेत.  आपल्याकडच्या सेक्युलर मीडिया कडून या गोष्टींची दखल घेतली जाईल आणि हिन्दू संघटनांवर जशा प्रकारचे कार्य्रकम तासंतास केले जातात तसे केले जाईल अशी अपेक्षा करणे चुकीचे आहे. कारण आपला देश हा सेक्युलर देश अाहे आणि असे कार्यक्रम केल्याने अल्पसंख्यांकाच्या भावना दुखवण्याची भीति असते. खरतर हया  अशा सेक्युलर लोकांना पेरिस हल्ल्यानंतर कुठे तोंड लपवावे हे काळात नव्ह्ते. जिथे जगभरातील मीडिया 'इस्लामिक दहशतवाद्यांचा  हल्ला' या मथळ्याखाली बातम्या चालवित होते, तिथे भारतीय मीडिया मात्र उघडपणे हा हल्ला एखाद्या धर्माशी जोडून बघायला बिचकत होती. कारण 'दहशतवादी हे कुणा एका धर्माचे नसतात तर ते अवघ्या मानवतेचे शत्रु असतात'  'काही अपवादात्मक लोकांमुळे एका संपूर्ण समाजाला दोषी धरने चुकीचे आहे'  या घासून पिसुन जुन्या झालेल्या तर्काना ते ठामपणे चिटकुन असतात किंव्हा छातीठोकपणे त्याना सत्य सांगण्याची हिम्मत नसल्याने त्याना अशा  तर्कांमागे  लपावे  लागते. जेव्हा अपवादात्मक गोष्टी पुनः पुनः घडू लागतात तेव्हा त्याचा गांभीर्याने विचार करण्याची गरज असते तेव्हा त्यांना अपवादात्मक म्हणून दुर्लक्षित करता येत नाही, परंतु  इतर वेळी हिन्दुच्या धार्मिक भावनांबद्दल बोथट असलेली माध्यमे अशावेळी  मुस्लिम धर्मियांबद्दल मात्र  अचानक अतिसंवेदनशील होउ लागतात कारण ते अल्पसंख्यंक आहेत.
            जून २०१२ आणि मार्च २०१३ ते ऑक्टोबर २०१३ पर्यन्त म्यांनमार मध्ये झालेल्या धार्मिक दंगली मध्ये मुस्लिमांच्या कत्तली झाल्या नंतर भारतामध्ये ईशान्य भारतीय नागरिकांवर दिल्ली बेंगलोर मुंबई मध्ये हल्ले झाले मुंबई मधे दंगल झाली शहीद स्मारकची तोड़फोड़ करण्यात आली महिला पोलिसांचा विनयभंग झाला मीडिया च्या गाड्यांची तोड़फोड़ झाली पण आज पर्यन्त काही कार्यवाही नाही जी काही थोडिफार धरपकड़ झाली तो देखील एक दिखावा होता प्रकरण शांत झाल्यावर मीडिया ने देखील दंगलीसाठी दोषी असलेल्या संघटनांवर बंदी साठी कार्यक्रम चालवले नाहीत
 भिवंडी मधील पुलिस कांस्टेबल च्या हत्येच्या तपासाचे पुढे काय झाल ? कूणालाच कल्पना नाही मीडिया ला ते दाखवायला वेळ नाही दररोज कुठल्यातरी व्यभिचारी बाबा-बूवाला पकडायच टीआरपी साठी मग त्याने केलेली कृत्ये  आणखीन आंबट करून  दाखवायची आणि दिवसभर धिंगाना चालू ठेवायचा. या मीडियाला साधु निगमनंदांसारख्या व्यक्तींचा सोयीस्कर विसर पड़तो. ज्या  व्यक्तिने  गंगासफ़ाईच्या आग्रहासाठी ७३ दिवस उपोषण  करून प्राणत्याग केला अशा व्यक्तींवर कार्यक्रम चालवायला मीडिया ला  वेळ नसतो कारण टीआरपी ची गैरंटी नसते. त्यापेक्षा आंबट आणि मसालेदार बातम्या जोरदार चालतात म्हणून चालवायच्या
देशाच्या मनुष्यबळ ऊर्जा मंत्री जेव्हा एका  भविष्यवत्त्या कड़े जातात तेव्हा त्यांच्यावर टिका करण्यासाठी सर्व मीडिया एकवटते परन्तु आपआपल्या चैनल्स वर दिवसाची  सुरवात करताना भविष्य सांगणाऱ्या कार्यक्रमांनी होते हे ते सोयीस्करपने विसरतात.  निर्मल बाबा ला धारेवर   धरणारे सर्व चैनल्स आज झाडून निर्मल बाबाच्या कार्यक्रमाच्या जाहिराती दाखवतात, का? तर पैसा मिळतो. आंबट आणि सनसनीखेज बातम्यानी जेंव्हा आवश्यक तेवढा पैसा गोळा  झाला नाही  की मग  कुठल्यातरी टीव्ही सीरियल चे एपिसोड दाखवायचे, कुठली टीवी सीरियल कुठल्या टप्प्यापर्यंत आली हे दाखवायचे. अशा गोष्टी देखील मीडिया च्या अखत्यारित येतात किव्हा न्यूज़ हो शकतात हे विशेष
काहीच नाही तर अल्पसंख़्यानक कसे या देशात नरकयातना भोगत आहेत या वर बातम्या चालवायच्या. परंतु सत्य दाखविण्याचे धाडस कुणी करत नाही. कदाचित त्याना स्वत:चा चार्ली हेब्दों होऊ द्यायचा नसतो. त्यापेक्षा हिंदू धर्मिय हे सॉफ्ट टार्गेट आहेत आणि नुकसान होण्याचीही काही  भीति नसते. झालाच तर फायदा होण्याची शक्यता जास्त असते.एक तर सर्व सेक्युलर राजकीय पक्ष सुखावतात आणि परदेशात बसलेले मिशनरी फण्ड पुरवणारे पाठ थोपटतात.
         स्टीवन जोएल सोटलॉफ (पत्रकार -टाइम मैगज़ीन ), जेम्स फ़ोले, वोल्केर हॅंडलॉक (जर्मनी), जॉन सुतोन  (फ्रांस), मारिया ग्रझिआ कुतुली(इटली),  पिअर बिलाउड (फ्रांस), जुलिओ फुएंट्स (यूनाइटेड स्टेट्स), अज़ियल्लाह हैदरी (अफगानिस्तान), हैरी बुर्टोन (ऑस्ट्रेलिया), उल्फ स्ट्रॉमबर्ग (स्वीडन), अब्दुल क़ुद्दूस (इजिप्त), करेन फीस्चेर(जर्मनी), क्रिस्चियन स्त्रुवे( जर्मनी), कर्स्टन थॉमसेन(नॉर्वे), मिचेल लांग (ब्रिटिश कोलंबिया), रूपर्ट हार्नर ( ब्रिटेन), जेम्स हंटर( यूनाइटेड स्टेट्स), नील्स होर्नर(स्वीडन), अन्जा निएड्रिनघुस      ( जर्मनी) ही  सर्व नावे  गेल्या काही  काळात तालिबान आणि ईसिस च्या दहशतवादाला बळी पडलेल्या पत्रकारांची आहेत. शोध पत्रकारिता (investigative journalism) मध्ये असलेली ही व्यक्ति आपापल्या देशासाठी प्राण धोक्यात घालून काम करत होती.  हे सर्व पत्रकार विकसित देशातील आहेत.  या देशांकडे गुप्तचरसंघटना नाहीत का? या देशांकडे अद्यवत तंत्रज्ञान नाही का? मग त्या त्या देशाच्या गुप्तचरसंघटना, सुरक्षायंत्रणा यांची जबाबदारी स्वताच्या खांद्यावर घेऊन या पत्रकारानी  प्राण का दिले ? आता यात भारतीय पत्रकार किती असा प्रश्न या सेक्युलर पत्रकारना कुणी विचारला तर त्यांच्या बुडाला किती आग लागेल ? आपल्या पत्रकारानी जाउन अशा प्रक्रारे प्राणत्याग करावा असा काही आग्रह/अपेक्षा नाही. पण देशभक्ति कशाला म्हणतात हे वरील पत्रकारना बघून आपल्या पत्रकारना समजावून घेता  येईल (इच्छा असेल तर!). (खर तर देशभक्ति काय असते हे बाहेरील लोकांकडून शिकण्याची गरज नाही.  आपल्याकडे देश्भक्तीची एकहूनेक उदाहरणे  आहेत पण याना बाहेरच्यांचे आकर्षण अधिक असते म्हणून म्हंटलं). माझ्या देशाला भविषयत उदभवु   शकणाऱ्या धोक्यांचा अंदाज घेण्यासाठी आणि वर्त्तमान परिस्थिति समजावून घेण्यासाठी ह्या सर्वाणि प्राण दिला आपल्या पत्रकारांना हे जमत नसेल तर अप्रत्यक्ष रित्या दहशतवादाचे समर्थन तरी करू नये
                   सरसकट एक समाजाला झोडपून काढायचे आणि दुसऱ्या समाजाच्या कृत्यांकडे सेकुलरिज्म च्या नावाखाली दुर्लक्ष करायचे हे प्रकार पत्रकारितेला शोभनारे नाहीत.



Saturday, 10 January 2015

काही दिवसांपूर्वी गुजरात च्या तटवार एक संशयास्पद बोट आढळून तटरक्षक दलाला  आढळून आली. आतमघातकी असलेल्या या बोटीवरील लोकांनी आपण पकडले जाणार या भीतीने त्या बोटीचा स्फोट घडविला. आणखी एक बोट पाकिस्तान च्या दिशेने गेल्याचा संशय तटरक्षक दलाने नोंदविला आहे. इलेक्ट्रॉनिक मीडिया मधे ही बातमी अलायनंतर एकच हाहाकार उडाला। २६/११ ची पुनरावृत्ती करण्याचा हा प्रकार आहे की काय या संशयाने इलेक्ट्रॉनिक मीडिया ने या संदर्भात बातम्या चालविल्या.  या बाबतचा तापस चालू आहे. मूलत या संदर्भात पुरावे गोळा करणे म्हणजे ढोपराने डोंगर पोखरन्यासारखे  आहे. तापस यंत्रणाना आवश्यक तो वेळ दिल गेल पाहिजे
                  दरम्यान भाजप आणि कांग्रेस मधे यावरून वाद उभा राहिला आहे. कांग्रेस ने आरोप केला आहे की तटरक्षक दलाने 'ती' अतिरेकी बोट असल्याचे जाहिर केलेले नसताना भाजप आपली पाठ थोपटवून घेत आहे. ती एक तस्करी बोट असू शकते भाजप ने ही कांग्रेस ल देशद्रोही म्हणत अतिरेक्यांची मदत करात असल्याचा आरोप केला आहे. 
आता प्रश्न हा आहे की ती बोट अतिरेक्यांची होती वा नव्हती ?
तटरक्षक दलाच्या म्हणण्यानुसार ती बोट  मच्छीमारांच्या मार्गाने भारताच्या दिशेने येत नव्हती. आणखी एक बोट पाकिस्तान कड़े परत गेल्याचा संशय ही तटरक्षक दलाने नोंदविला आहे. जर ती तस्कारांची बोट होती तर कुणीही तस्करानी माल पकडला जाईल या भीतीने स्वतःच स्फोट घडविला असल्याचे उदहारण आज पर्यन्त एकिवत नाही.  तस्कर पकडले जाण्याच्या भीतीने एक तर माल फेकून पसर होतात नाहीतर संबंधित अधिकाऱ्याशी तोड़पानी कार्यंयाचा प्रयत्न करतात.  परन्तु या लोकनि बोटीसहित स्वतःला उडविले अशाप्रकारची घूसखोरी होईल असे इनपुट देखील  आइबी कडून तटरक्षक दलाला मिळाले होते. त्यामुळे ती अतिरेकी बोट  असण्याची शक्यता जास्त आहे. 
या सर्व प्रकारामध्ये कांग्रेस सारख्या १४० वर्षे जुन्या असलेल्या पक्षाने घेतलेली भूमिका चिंताजनक आहे. भाजप ला याचे श्रेय मिळू नए म्हणून कांग्रेस ने थेट ती बोट तस्कारांची असू शकते असा युक्तिवाद मांडला आहे. या मुळे अंतर्राष्ट्रीय जगतात भारताची प्रतिमा मलिन होईल किव्हा अतिरेक्यांना या मुळे मानसिक बल मिळेल याचे भान देखील कांग्रेस ल राहिले नाही. असे प्रकार कांग्रेस कडून घडण्याची ही काही पहलि वेळ नाही बाटला हाउस एनकाउंटर , इशरत जहाँ एनकाउंटर, २६/११ हल्ल्यामधील करकरे मृत्यु प्रकरण असेल कांग्रेस असले प्रकार या आधीही केले आहेत पक्षाचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह या साठी प्रसिद्ध आहेत. खरतर असे प्रकार देशद्रोह आहेत हे कांग्रेस ला कळत नाही असे नाही परंतु एक कट्टर समाज आपल्या मागे ठाम उभा राहावे या साठी विचारपूर्वक केलेली ही एक खेळी आहे. सध्या कांग्रेस समोर अस्तित्वचा प्रश्न आहे.  गेल्या १४० वर्षामधे कांग्रेस या इतकी कधीही कमजोर नव्ह्ती. घरवापसी मुद्द्याशिवाय देशभरात रान उठवता येईल असा एकही मुद्दा कांग्रेस च्या गेल्या ७-८ महिन्यात लागलेला नाही. महाराष्ट्र, हरियाणा, झारखंड, जम्मू आणि कश्मीर मधील निवडणुकातून देशात मोदी लाट  अजूनही कायम असल्याचे सिद्ध झाले आहे. लोकसभा निकलानंतर कांग्रेस अजूनही स्वतःला सावरु शकलेली नाही त्या मधे भर दिशाहीन नेतृत्वाची. सतत उतरत असलेले पेट्रोल डीजल चे भाव, शून्यावर  आलेला महागाई दर आणि त्यात येऊ घातलेल्या दिल्ली, उत्तर प्रदेश, बिहार आणि  पश्चिम बंगाल मधील निवडणुका. या सर्व राज्यात (दिल्ली सोडून) प्रादेशिक पक्षांची सत्ता आहे. मोदीलाटेत ये राज्य भाजपच्या ताब्यात गेले तर कांग्रेस साठी आणखीन वाईट परिस्थिति निर्माण होईल. म्हणून मिळेल तय मुद्द्यावर भाजपवार तुटून पडण्याची कांग्रेस धुरिणीची रणनीति दिसते. त्याचाच एक भाग म्हणून पक्षाचे नवनियुक्त प्रवक्ते अजॉय कुमार यांनी पेट्रोलचे दर ३३ रु करण्याची मागणी केली अन्तर्राष्ट्रीय बाजारात प्रति बैरल पेट्रोल डीजल चे भाव उतरले असले  तरी रु ३३ पर्यन्त भाव कमी करण्याची कांग्रेस ची मागणी व्यहवार्य नाही हे कांग्रेस देखील जाणून आहे. परंतु इतर फरसे पर्याय देखील कांग्रेस कड़े शिल्लक  नाही. उरलेले कही पर्याय म्हणजे आपली पारंपरिक मुस्लिम वोट बैंक मजबूत करणे त्याचाच एक भाग म्हणून कांग्रेस कट्टर मुस्लिमना खुश करण्याच्या हेतुने वरील प्रकरणात नविन नविन तर्क मांडू पाहत आहे. परन्तु कांग्रेस सारख्या पक्षाला हे मुळीच शोभनीय नाही.  राष्ट्रवाद आणि देशद्रोह हे कांग्रेस लांच पुनः एकदा समजून घेण्याची वेळ आली आहे.