काही दिवसांपूर्वी गुजरात च्या तटवार एक संशयास्पद बोट आढळून तटरक्षक दलाला आढळून आली. आतमघातकी असलेल्या या बोटीवरील लोकांनी आपण पकडले जाणार या भीतीने त्या बोटीचा स्फोट घडविला. आणखी एक बोट पाकिस्तान च्या दिशेने गेल्याचा संशय तटरक्षक दलाने नोंदविला आहे. इलेक्ट्रॉनिक मीडिया मधे ही बातमी अलायनंतर एकच हाहाकार उडाला। २६/११ ची पुनरावृत्ती करण्याचा हा प्रकार आहे की काय या संशयाने इलेक्ट्रॉनिक मीडिया ने या संदर्भात बातम्या चालविल्या. या बाबतचा तापस चालू आहे. मूलत या संदर्भात पुरावे गोळा करणे म्हणजे ढोपराने डोंगर पोखरन्यासारखे आहे. तापस यंत्रणाना आवश्यक तो वेळ दिल गेल पाहिजे
दरम्यान भाजप आणि कांग्रेस मधे यावरून वाद उभा राहिला आहे. कांग्रेस ने आरोप केला आहे की तटरक्षक दलाने 'ती' अतिरेकी बोट असल्याचे जाहिर केलेले नसताना भाजप आपली पाठ थोपटवून घेत आहे. ती एक तस्करी बोट असू शकते भाजप ने ही कांग्रेस ल देशद्रोही म्हणत अतिरेक्यांची मदत करात असल्याचा आरोप केला आहे.
आता प्रश्न हा आहे की ती बोट अतिरेक्यांची होती वा नव्हती ?
तटरक्षक दलाच्या म्हणण्यानुसार ती बोट मच्छीमारांच्या मार्गाने भारताच्या दिशेने येत नव्हती. आणखी एक बोट पाकिस्तान कड़े परत गेल्याचा संशय ही तटरक्षक दलाने नोंदविला आहे. जर ती तस्कारांची बोट होती तर कुणीही तस्करानी माल पकडला जाईल या भीतीने स्वतःच स्फोट घडविला असल्याचे उदहारण आज पर्यन्त एकिवत नाही. तस्कर पकडले जाण्याच्या भीतीने एक तर माल फेकून पसर होतात नाहीतर संबंधित अधिकाऱ्याशी तोड़पानी कार्यंयाचा प्रयत्न करतात. परन्तु या लोकनि बोटीसहित स्वतःला उडविले अशाप्रकारची घूसखोरी होईल असे इनपुट देखील आइबी कडून तटरक्षक दलाला मिळाले होते. त्यामुळे ती अतिरेकी बोट असण्याची शक्यता जास्त आहे.
या सर्व प्रकारामध्ये कांग्रेस सारख्या १४० वर्षे जुन्या असलेल्या पक्षाने घेतलेली भूमिका चिंताजनक आहे. भाजप ला याचे श्रेय मिळू नए म्हणून कांग्रेस ने थेट ती बोट तस्कारांची असू शकते असा युक्तिवाद मांडला आहे. या मुळे अंतर्राष्ट्रीय जगतात भारताची प्रतिमा मलिन होईल किव्हा अतिरेक्यांना या मुळे मानसिक बल मिळेल याचे भान देखील कांग्रेस ल राहिले नाही. असे प्रकार कांग्रेस कडून घडण्याची ही काही पहलि वेळ नाही बाटला हाउस एनकाउंटर , इशरत जहाँ एनकाउंटर, २६/११ हल्ल्यामधील करकरे मृत्यु प्रकरण असेल कांग्रेस असले प्रकार या आधीही केले आहेत पक्षाचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह या साठी प्रसिद्ध आहेत. खरतर असे प्रकार देशद्रोह आहेत हे कांग्रेस ला कळत नाही असे नाही परंतु एक कट्टर समाज आपल्या मागे ठाम उभा राहावे या साठी विचारपूर्वक केलेली ही एक खेळी आहे. सध्या कांग्रेस समोर अस्तित्वचा प्रश्न आहे. गेल्या १४० वर्षामधे कांग्रेस या इतकी कधीही कमजोर नव्ह्ती. घरवापसी मुद्द्याशिवाय देशभरात रान उठवता येईल असा एकही मुद्दा कांग्रेस च्या गेल्या ७-८ महिन्यात लागलेला नाही. महाराष्ट्र, हरियाणा, झारखंड, जम्मू आणि कश्मीर मधील निवडणुकातून देशात मोदी लाट अजूनही कायम असल्याचे सिद्ध झाले आहे. लोकसभा निकलानंतर कांग्रेस अजूनही स्वतःला सावरु शकलेली नाही त्या मधे भर दिशाहीन नेतृत्वाची. सतत उतरत असलेले पेट्रोल डीजल चे भाव, शून्यावर आलेला महागाई दर आणि त्यात येऊ घातलेल्या दिल्ली, उत्तर प्रदेश, बिहार आणि पश्चिम बंगाल मधील निवडणुका. या सर्व राज्यात (दिल्ली सोडून) प्रादेशिक पक्षांची सत्ता आहे. मोदीलाटेत ये राज्य भाजपच्या ताब्यात गेले तर कांग्रेस साठी आणखीन वाईट परिस्थिति निर्माण होईल. म्हणून मिळेल तय मुद्द्यावर भाजपवार तुटून पडण्याची कांग्रेस धुरिणीची रणनीति दिसते. त्याचाच एक भाग म्हणून पक्षाचे नवनियुक्त प्रवक्ते अजॉय कुमार यांनी पेट्रोलचे दर ३३ रु करण्याची मागणी केली अन्तर्राष्ट्रीय बाजारात प्रति बैरल पेट्रोल डीजल चे भाव उतरले असले तरी रु ३३ पर्यन्त भाव कमी करण्याची कांग्रेस ची मागणी व्यहवार्य नाही हे कांग्रेस देखील जाणून आहे. परंतु इतर फरसे पर्याय देखील कांग्रेस कड़े शिल्लक नाही. उरलेले कही पर्याय म्हणजे आपली पारंपरिक मुस्लिम वोट बैंक मजबूत करणे त्याचाच एक भाग म्हणून कांग्रेस कट्टर मुस्लिमना खुश करण्याच्या हेतुने वरील प्रकरणात नविन नविन तर्क मांडू पाहत आहे. परन्तु कांग्रेस सारख्या पक्षाला हे मुळीच शोभनीय नाही. राष्ट्रवाद आणि देशद्रोह हे कांग्रेस लांच पुनः एकदा समजून घेण्याची वेळ आली आहे.
No comments:
Post a Comment